शेतकऱ्यांची सर्वात पडती बाजू समजून घेण्यासाठी आपल्याला विविध गोष्टींचा विचार करावा लागेल. शेतकरी राजाला शेतीमध्ये काबाडकष्ट करून आजुन शेतीबरोबर एखादा जोड उद्योग करुन आपले कुटुंब सांभाळावे लागते. शेती बरोबर शेतकरी राजाला गाई म्हशींच्या दुधाचे उत्पादन घ्यावे लागते. कुकुड पालन करावे लागते. एक दोन शेळ्या पाळाव्या लागतात यावेळी शेतकरी राजाची विविध प्रकारे लुट केली जाते. फसवणूक केली जाते आणि हे शेतकरी राजाला माहिती असुनही ते स्वीकारावे लागते
आता आपण दोन प्रकारे शेतकऱ्यांची सर्वात पडती बाजू पाहु
विक्री करताना
- स्वतःच्या मालाला भाव स्वतः न ठरवता येणे
- मालाची तुट स्वतः न ठरवता येते
- काही पिकांचे वजन स्वतः न करता येणे
शेतकऱ्यांने कष्टाने पिकविलेल्या माळव्याला , कडधान्याला , हळद – ऊसाला दर (भाव) ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्यांलाच नाही, व्यापारी कारखानदार जो भाव ठरवतील तोच शेतकरयांना मानावा लागतो.व्यापारी त्यांच्या वाहनातुन माल मोठ्या शहरात नेतो. तेथे जो काही दर ठरेल त्यामधुन वाहतुक ,हमाली वजा करून उरलेली रक्कम शेतकरयांना देतो . जेव्हा ऊस कारखान्याला जातो तेव्हा त्याला दरही कारखानदारच ठरवतो.ऊसा बरोबर जो पाला जातो त्याची तुट धरली जाते आणि ती तुटही कारखानदारच ठरवतो. मजुरांचे तोडलेल्या ऊसाच्या पाल्याची वेगळी आणि मशीन द्वारे तोडलेल्या ऊसाची

वेगळी. मशीन द्वारे तोडलेल्या ऊसाची तुट जास्त धरली जाते आता शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला जातो तेव्हा ऊसाने भरलेल्या वाहनांचे वजन करण्यासाठी वेगळा वजन काटा आणि मोकळ्या वाहनांचे वजन करण्यासाठी वेगळा वजन काटा असतो आणि दुर्दैवी बाब म्हणजे हे दोन्ही वजन काटे कारखानदाराच्याच अंडर असतात .कारखानदार आपल्या ऊसाची वजनाची जी पावती देईल तेच योग्य वजन हे आपल्याला ग्राह्य धरावे लागते. मजेशीर आणि दुर्दैवी बाब म्हणजे आपण (शेतकरी)आपल्या ऊसाचे वजन करताना तेथे उभा सुद्धा राहु शकत नाही . आपणच आपल्या मालाचा भाव ठरऊ शकत नाही ही दुर्दैवी गोष्ट आणि मजेशीर ही की आपल्याला हे माहीत असूनही आपण ते स्वीकारुन त्यावर काहीच करत नाही. असे जगात कोणतेही ऊसा सारखे पिक नसेल की ज्याचे वजन करताना तेथे त्या पिकाचा मालक तेथे नसेल.यावर सरकार हि काही पाऊले उचलत नाही आणि कारखानदार तर उघडच विरोध करतात.
खरेदी करताना
- किम्मत समोरचा ठरवेल ती
- मालामध्ये तुट धरलीच जात नाही
- वजन विक्रेता ठरवेल तो
जेव्हा आपण एखाद्या खतांची बॅग आणण्यासाठी दुकानात जातो तेव्हा काही खतांच्या बॅगा ह्या ५० किलो वजनाच्या असतात काही २५ किलो वजनाच्या असतात काही काही ५ ते १० किलोच्या ही पिशव्या विक्री साठी असतात त्यांचे वजन आपण ठरवू शकत नाही, त्यांची किंमत ही आपण ठरवू शकत नाही.तर त्यांची किंमत आणि वजन हे ती ती कंपनी स्वतःच्या फायद्या बरोबर विक्रेत्यांच्या फायद्या सहीत ठरवते , किंबहुना बॅगवर अधिक जास्त किंमत छापलेली असते अगदी तसेच आपल्या गाई म्हशींच्या दुधाचे भाव आपण ठरवू शकत नाही कारण शेतकरी दुधाची विक्री करत असतो मात्र खरेदी करताना म्हशींच्या खाद्याचे भाव आणि वजन हे शेतकरी राजावर लादले जाते .


पुर्वी ५० ते ६० किलो वजनाची पशुखाद्य पोती आता ३८ किलो पर्यंत खाली आणली गेली तेही पोत्याच्या वजना सहीत तरीही ती खाद्याची पोती शेतकरयांना मोकळ्या पोत्याच्या वजनाची तुट न धरता कंपनी ने ठरवलेल्या दराप्रमाणे खरेदी करावी लागतात. ज्या प्रकारे ऊसाच्या वजना वेळी शेतकरी तेथे उभा राहुन शकत नाही.तेथे काटा मारून कमी वजन दाखवले जाते या उलट जेव्हा शेतकरी दुकानातून गुळ आणण्यासाठी दुकानात जातो तेव्हा मात्र गुळाची ढेप १ किलो चे पैसे देऊन ९०० ग्रम घ्यावी लागते आणि तरीही आपण कोठेही आवाज उठवु शकत नाही
पैशे देताना घेताना
तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा जेव्हा शेतकरी त्याचा माल विकतो तेव्हा त्याला कधीच माल विकणे वेळी त्याचा मोबदला मिळत नाही. माळव्याच्या पट्या आल्यावर खुप दिवसांनी पैसे मिळतात. ऊस गेल्यावर एक दोन महिन्यांनी बिले मिळतात.तर दुध घातल्यानंतर दहा दिवसांनी पगार होतो.याउलट शेतीची खते रोख घ्यावी लागतात. पशुखाद्य रोख किंवा आपण घातलेल्या दुधातुन वजा करने ग्राह्य धरुन घ्यावी लागतात. आणि पिक कर्जासाठी जमीन धरली जाते.
https://royalxshetkari.in/?post_type=web-story&p=194&preview=true
तात्पर्य – शेतकरी राजाला त्याचा माल विकताना वजनामध्ये, दरामध्ये आणि लादलेल्या तुटी मध्ये नुकसान निमुटपणे सहन करावे लागते आणि शेतकरी राजाला खरेदी करताना ही अधिक रक्कम मोजून आणि अनियंत्रित वजनाचा माल खरेदी करून नुकसान निमुटपणे सहन करावे लागते.अशाप्रकारे दोन्ही बाजूंनी आपले नुकसान अजुनही होत चाललेले आहे.
ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुम्ही तुमच्या शेतकरी मित्रांना पाठवा मोकळ्या वेळेत या विषयावर चर्चा करा आणि आपण सर्व शेतकरी बांधव शेतीविषयक आणि शेतकरी राजाच्या फायद्या विषयीच्या बाबतीत एकजुट रहा .
उद्या आपण शेतकरी राजाला राजकारणा मुळे कसा तोटा होतो त्याविषयी चर्चा करणार आहोत.